आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Dipali Chavan Suicide Case Updates; Why Does The Government Insist On Saving Every Accused Person? Devendra Fadnavis' Question

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:प्रत्येक आरोपित व्यक्तीला वाचवण्याचा सरकारचा अट्टाहास का?- देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन टीका

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यात राजकीय वातावरणही तापले आहे. या प्रकरणी वनविभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचा या मविआ सरकारचा अट्टाहास का ?' असा सवाल फडणवीसांनी विचायरलाय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. फडणवीसांनी ते पत्र सोशल मीडियावरही टाकले आहे. यात फडणवीसांनी वरिष्ठमहिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये फडणवीस म्हणतात की, दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्‍यांची आणि जलदगती न्यायालयात खटला चालवून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा.

फडणवीस पुढे म्हणतात की, 'खरं तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?, असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.

अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्या आणखी आहेत...