आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Discharge Of Water From Koyna Dam Increased, Citizens Banned For Immersion Of Gauri Ganpati On Krishna Koyna River

सातारा:कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, कृष्णा कोयना नदीकाठी गौरी गणपती विसर्जनासाठी नागरिकांना बंदी

सातारा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले तीन-चार दिवस झाले सलग जोराचा व मुसळधार पाऊस पडत आहे.

कोयना तसेच कण्हेर , तारळी धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कोयना, कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना गौरी गणपती विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली घातली आहे. विशेषतः कराड शहर व परिसरात कराड नगर परिषदेने व पोलिसांनी अशा प्रकारे बंदी घालून त्यांनीच विसर्जन करण्यासाठी वेगवेगळी संकलन केंद्रे उभी केली आहेत व त्यांच्या मार्फतच विसर्जनाची सोय केली आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले तीन-चार दिवस झाले सलग जोराचा व मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फूट तीन इंच उचलून नदी पात्रात 49 927 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणाचा पाणी साठा 104.92 टिएमसी झाली असुन धरण 99.69% भरले आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्याच्या हेतूने धरणातून पाणी सोडले जात आहे. त्याच पद्धतीने तारळी व कन्हेर या धरणातून देखील पाणी सोडण्यात आल्याने हे पाणी कृष्णा नदीच्या पात्रात जात आहे. तसेच कोयनेचे ही मानवी कराड जवळ कृष्णा नदीत संगमाच्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे अर्थातच जवळ नदीपात्रात पाणी साठा वाढला आहे.

जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय व सावधानतेचा उपाय म्हणून गौरी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांना व सार्वजनिक मंडळांना ही बंदी घातली आहे. यासंदर्भात कराड शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी माहिती दिली. कराड शहर व परिसरात त्या त्या स्थानिक प्रशासनाने घरगुती गणेशाचे विसर्जन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणेशाचे विसर्जन करण्यासाठी स्वतःच जबाबदारी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...