आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिक्षेवर निर्णय:12वीच्या परीक्षेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, राज्य सरकार परिक्षा रद्द करण्याच्या बाजूने

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला

महाराष्ट्रा राज्य सरकार १२ वीच्या परिक्षा रद्द करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत गुजरात आणि केंद्राने सीबीएसई संदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती मंत्रिमंडळाला दिली. यासंदर्भात प्रस्ताव हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सुद्धा वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्य सरकार १२ वीची परिक्षा ही २२ एप्रिलला घेणार होते मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता ही परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता यानंतर ही परिक्षा पुन्हा होणार की रद्द होणार याकजे सर्वांचे लक्ष होत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळून कोणतीही परिक्षा न घेण्याचा राज्य सरकारचा मानस आहे त्यामुळे ही परिक्षा ज्या पद्धतीने केंद्रात सीबीएसई बोर्डाने रद्द केली तशीच रद्द करण्या संदर्भात प्रयत्न चालू आहे.

राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी सीबीएसई परिक्षेसंदर्भात राज्यातल्या शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या बैठकीत सुद्धा अनेक राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी परिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. लसीकरण केल्यानंतर परिक्षा घेण्याची मागणी अनेकांनी केली होती मात्र लसीकरण पुर्ण करण्यासाठी अनेक महिण्यांचा कालावधी लागू शकतो यासाठी राज्य सरकार परिक्षा रद्द करण्याच्या समर्थनार्थ भुमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...