आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकीय चर्चा:शरद पवार मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चाणां उधाण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो

राज्यातील पोलिस दलातील बदल्या आणि पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ‘मातोश्री’वर भेट घेतली. 

महाविकास आघाडीतील धुसफूस दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईतील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्यमंत्र्यांना  काहीच कल्पना नव्हती. त्यामुळेच अवघ्या तीन दिवसात या बदल्या रद्द करण्यात आल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वत: ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना ‘मातोश्री’वर यावे लागल्याचे चित्र आहे.

या चर्चेसाठी, शरद पवार आणि अनिल देशमुखांसह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आव्हाड  संध्याकाळी 6 च्या सुमारास ‘मातोश्री’वर दाखल झाले. शरद पवार मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर संध्याकाळी 6.30 च्या सुमारास मंत्री आदित्य ठाकरे बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ जितेंद्र आव्हाडही बाहेर आले. यानंतर मग 10 मिनिटांनी म्हणजे 6 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवरुन बाहेर पडले. अनिल देशमुख बाहेर पडल्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येच चर्चा झाली. या नेत्यांमध्ये नेमकी कोणात्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.

0