आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Dispute Between Two Brothers For Mother's Funeral; After The Intervention Of The Police, One Child Performed The Funeral Rites In A Christian Manner And The Other In A Hindu Manner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांनी केली मध्यस्थी:आईच्या अंत्यविधीसाठी दोन भावांमध्ये वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर एका मुलाने ख्रिश्चन तर दुसऱ्या मुलाने हिंदू पद्धतीने केला अंत्यविधी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादामुळे अंत्यविधीला झाला 24 तासांचा उशीर, पोलिसांनी काढला मधला मार्ग

महाराष्ट्रातील पालघरमध्ये काही वर्षांपूर्वी ख्रिश्नन धर्म स्विकारलेल्या एका महिलेला तिच्या मृत्यूनंतर दोन मुलांपैकी एका मुलाने दफन केले, तर दुसऱ्याने सांकेतिकरित्या हिंदू पद्धतीने दहन केले. पालघरमध्ये एका आईच्या अंत्यविधीच्या पद्धतीवरुन दोन भावांमध्ये झालेल्या वादाने 1998 मध्ये आलेला महेश भट्टचा चित्रपट 'जख्म'ची आठवण करुन दिली. या चित्रपटात अॅक्ट्रेस (पूजा भट्ट)च्या मृत्यूनंतर तिला दफन करण्यावरुन दंगली होतात.

हिंदू मुलाने सांकेतिक पद्धतीने केला अंत्यविधी

पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की, गुरुवारी पालघर जिल्ह्यातील वडा तालुक्यातील अवांडे गावात राहणाऱ्या 65 वर्षीय फुलाई धाबडे यांच्या मृत्यूनंतर त्यांची दोन मुले, महादू आणि सुधान यांच्यात अंत्यविधीवरुन वाद झाला. मोठा भाऊ महादूने ख्रिश्न धर्म स्विकारला आहे. त्याला आपल्या आईचा अंत्यविधी ख्रिश्नन पद्धतीने करायचा होता, तर सुधानला त्याच्या आईचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने करायचा होता.

पोलिसांनी केली मध्यस्थी

दिलीप पवार म्हणाले की, दोन्ही मुले ऐकायला तयार नव्हते. दोघांच्या वादामुळे अंत्यविधीला 24 तासांचा उशीर झाला होता. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक गावात पोहचले आणि त्यांनी दोन्ही भावांना समजून सांगितले. अखेर तोडगा निघाला आणि महिलेला ख्रिश्न पद्धतीने दफन करण्यात आले, तर महिलेच्या कपड्यांना सांकेतिकरित्या हिंदू पद्धतीने दहन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...