आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:दिवाळी सणातही 24 तास कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना आमदार संतोष बांगर यांची जादू की झप्पी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात मागील दोन ते तीन वर्षापासून सण उत्सवाच्या काळातही २४ तास कर्तव्यावर राहणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमदार संतोष बांगर यांनी शुक्रवारी ता. 5 भेट घेऊन जादू की झप्पी दिली. जनतेचे रक्षण करणारे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बद्दल त्यांनी कृतज्ञताभाव व्यक्त केला.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील दोन-तीन महिन्यांपासून पोलीस अधिकारी व कर्मचारी सण उत्सवाच्या काळात ही २४ तास बंदोबस्तावर आहेत. बाजारपेठेमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवून अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबतीतही पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. एकीकडे बंदोबस्ताचा ताण तर दुसरीकडे गुन्हे निकाली काढण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागील तीन महिन्यापासून चांगलीच धावपळ होऊ लागली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख हे स्वतः जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी ठाणेदारांना मार्गदर्शन करण्याचे काम आहे केले जात आहे.

दरम्यान आमदार संतोष बांगर बाजारपेठेत गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर राहुन गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची काम करीत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गर्दीतील नागरिकांनाही सन्मानाची वागणूक दिली जाऊ लागली.

दिवाळीसारख्या सणात २४ तास बंदोबस्तावर का राहणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आमदार बांगर यांनी जादूची झप्पी दिली. सणासुदीतही नागरिकांसाठी काम करत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांच्याप्रती कृतज्ञता भावही आमदार बांगर यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिधींकडून मिळालेल्या कौतुकाच्या थापे मुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचा थकवाही कमी झाला. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...