आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेला टोला:'स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका', दिलीप-वळसे पाटलांनी दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना फटकारले

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारने मनाई केली होती. मात्र, हे मनाई आदेश झुगारून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाण्यात दहीहंडी फोडली. त्यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, यावरून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरे यांना फटकारले आहे.

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 'देशात अद्यापही कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचीदेखील शक्यता आहे. तिसरी लाट आल्याने राज्याला नुकसान होऊ शकते, असेही ते म्हणाले.

तसेच यावेळी वळसे-पाटील यांनी सहकार कायद्यावरही भाष्य केले. यावर ते म्हणाले की, “सहकार कायद्याने होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एक विचार गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचा अहवाल आल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात येईल.”

काय म्हणाले होते राज ठाकरे?
सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. त्यांना मंदिरं सुरू, आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत. त्यामुळे सणांवरच बंधन का?, असा सवाल राज यांनी केला होता.

हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं, असं सांगतानाच मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू, नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असं करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, अशीही टीका राज ठाकरेंनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...