आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाजपचा पलटवार:'कोणी चंपा म्हणतं तर कोणी टरबुज्या म्हणतं, पण आता शांत बसू नका, सडेतोड उत्तर द्या'- चंद्रकांत पाटील

मुंबई3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कोणतीही टीका खपवून न घेण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 'महाविकासआघाडी सरकारच्या तीन्ही पक्षांच्या ट्रोलर्सकडून सोशल मीडियावर खालच्या भाषेत नेत्यांवर टीका केली जाते. कोणी चंपा म्हणत... कोणी टरबुजा म्हणत...आता खपवून घेऊ नका, पलटवार करा. शांत बसणे म्हणजे मान्य करण्यासारखे आहे. सडेतोड उत्तर द्या,' असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत दिला. बैठकीतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चंद्रकांत पाटलांनी मागील काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि शरद पवारां टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलर्सकडून अतिशय खालच्या शब्दात उत्तर देण्यात आले. एका कार्यकर्त्याने तर कुत्र्याची उपमा दिल्याचे चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितले. पाटील म्हणाले की, 'विरोधी पक्ष म्हणून प्रभावी भूमिका बजावावी. कोणावरही केलेले स्टेटमेंट खपवून घ्यायचे नाही. पलटवार करा. दोन दिवसात मी अनेक स्टेटमेंट केली, ती सहन होत नाहीत त्यांना झोंबतात. यातूनच त्यांच्या एका कार्यकर्त्याने अतिशय खालच्या लेवलला जावून कुत्रा म्हणणारी पोष्ट टाकली. मी सगळी यंत्रणा अॅक्टीव्ह केली. दोन तासात त्यांना ती पोस्ट मागे घ्यावी लागली आणि विनवण्या कराव्या लागल्या.'

शांत बसणे म्हणजे मान्य करण्यासारखे आहे. शब्द चांगले वापरा जेणेकरून ते मागे घ्यावे लागू नयेत. आमच्या शब्दात धार जास्त आहे म्हणूनच तर त्यांना बोचतय असेही त्यांनी यावेळी सांगितले.