आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल कोल्हेंचा संताप:संरक्षण मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या 'त्या' विधानाचा डॉ. अमोल कोल्हेंकडून निषेध, म्हणाले...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते.', असे मत खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडले आहे.

संरक्षणमंत्र्यांचा दावा...
राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळातून शिक्षण दिल्यानेच शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडतानाच, राष्ट्रनायक झाले. आपण महाराष्ट्रातच आहोत, ज्याठिकाणी एका खेळाने एका मुलाला राष्ट्रनायक म्हणून घडवले, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...