आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकनृत्यावर ताल:भाजपची जनआशीर्वाद यात्रा, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक जण थिरकले आदिवासी नृत्यावर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. पालघरमध्ये भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरु असताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.

यावेळी, मोदी सरकारच्या कामाची, महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जनतेला देण्यासाठी त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील त्रुटी दाखवण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने सर्वाधिक लसी महाराष्ट्राला उपलब्ध करुन दिल्या. मात्र, राज्य सरकार तरीही लसींचा पुरवठा होत नाही अशी तक्रार करत आहे, अशा शब्दांत पवार यांनी राज्य सरकारवर निशाना साधला.

बातम्या आणखी आहेत...