आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड:राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे निधन, वयाच्या 104 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज(दि.1) 104 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. अहमदपूरकर अप्पांचे देशभरात लाखो भाविक होते. त्यांच्या जाण्याने लिंगायत समाजात शोककळा पसरली आहे.

जिवंत समाधी घेणार असल्याची पसरली होती अफवा

काही दिवसांपूर्वी शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. यानंतर महाराजांचे राज्यासह इतर राज्यातील हजारो भाविकांनी अहमदपूर येथील मठात गर्दी केली होती. परंतू, पोलिसांनी आणि आश्रम प्रशासनाने वाढती गर्दी लक्षात घेवून ती फक्त अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.