आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Drugs Case । NCB Raids Chunky Pandey's Daughte Ananya's House; Called To The NCB Office For Questioning This Afternoon At 2 P.m.

अनन्याच्या मागे एनसीबी:आर्यननंतर चंकी पांडेची मुलगी अडचणीत, एनसीबीने टाकला अनन्याच्या घरी छापा; आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाला होता. नुकतेच किंग खानचा मुलगा आर्यन खानचा याला देखील ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली असून, गेल्या 18 दिवसांपासून तो जेलमध्ये आहे.

आर्यन नंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक नाव ड्रग्स प्रकरणात समोर येत आहे. अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीने छापेमारी केली आहे. अनन्या पांडे ही प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडेंची मुलगी आहे. आर्यन प्रकरणात चौकशी दरम्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एका अभिनेत्रीचे नाव समोर आले होते. ती अभिनेत्री अनन्या असल्याची शक्यता आहे.

दरम्यान क्रूझ पार्टी प्रकरणावरू आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून तुरुंगात आहे. बुधवारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर आज एनसीबीने ही मोठी कारवाई केली आहे. एनसीबीच्या या कारवाईमुळे चित्रपटसृष्टीतील आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. अनन्या एनसीबीने समन्स बजावले असून, तिला आज दुपारी दोन वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...