आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:एसटी आणि सार्वजनिक बससेवा सुरू करण्यासाठी वंचितचे राज्यभर डफली बजाव आंदोलन

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे सध्या लॉकडाउन लावण्यात आला आहे. या लॉकडाउनचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज राज्यभर 'डफली बजाव आंदोलन' करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा लॉकडाऊनला विरोध आहे.

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो आणि शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी होती. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील अनेक शहरांमध्ये वंचितकडून डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...