आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Economic Survey Report Presented In Maharashtra Assembly: Growth Rate Is Expected To Fall 8%, Revenue Estimate Is Only 50.8%

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक सर्वेक्षण अहवाल:अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल, कोरोना संसर्गाचा राज्याला मोठा फटका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृषी आणि त्यासंबंधी क्षेत्रांमध्ये 11.7% वाढीचा अंदाज

पुढच्या आठवड्यात विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. यानुसार, 31 मार्चपर्यंत 8 टक्के घसणर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थ राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी 2020-21 ची आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.

अजित पवारांनी सादर केलेल्या अहवालानुसार, कृषी आणि त्यासंबंधी क्षेत्रांमध्ये 11.7% वाढीचा अंदाज, तर उद्योगात 11.3%, सेवा क्षेत्रात 9%, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 11.8% आणि कंस्ट्रक्शन क्षेत्राच 14.6% घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय, 2020-21 च्या बजेटमध्ये 3,47,457 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, प्रत्यक्षात मात्र एप्रिल-डिसेंबर 2020 दरम्यान 1,76,450 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, म्हणजे, आपक्षेपेक्षा 50.8 टक्के कमी महसूल मिळाला आहे.

उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशापेक्षा महाराष्ट्राची कमाई अधिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशापेक्षा जास्त असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 2019-20 मध्ये 2011-12 च्या आधारे महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई 2,02,130 रुपये होती. तर यूपीमध्ये 65,704 रुपए आणि मध्य प्रदेशात 99,763 रुपये होती. यावर्षी महाराष्ट्रात प्रती व्यक्ती कमाई कमी होऊन 1,88,784 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...