आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने शुक्रवारी (१७ जून) अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत ईडीची कोठडी ठोठावली आहे. गेल्या वर्षी याच प्रकरणात ईडीने श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष व अप्पासाहेबांचे भाऊ महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब देशमुख यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेने सातारा जिल्ह्यात विशेषतः माण - खटाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्याकडून अॅडमिशनसाठी पैसे गोळा केल्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे.
२०० जागा, ३५० विद्यार्थ्यांकडून उकळले २९ कोटी रुपये
सन २०१२-१३ आणि १३-१४ या शैक्षणिक वर्षांसाठी मायणी वैद्यकीय महाविद्यालयात दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेशास मंजुरी (एकूण २००) देण्यात आली होती. त्यामध्ये ८५ शासकीय व १५ व्यवस्थापनाचा कोटा होता. कॉलेजने निर्धारित जागांपेक्षा १५० अधिक म्हणजे ३५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आमिष दाखवून २९ कोटी रुपयांची रोख रक्कम उकळली. मात्र प्रवेश दिलेच नाहीत. सन २०१४ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाला परवानगी नव्हती, असे ईडीने सांगितले. या पैशांचा स्रोत कळू नये यासाठी संस्थेचे कोषाध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांनी ही रक्कम स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या नावे बँकांमध्ये ठेवली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.