आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीची नोटीस:संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस, भाजप सुडाचे राजकारण खेळत असल्याचा आघाडीचा आरोप

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खडसंे पाठाेपाठ राऊतांना आलेल्या नोटिसीने राज्यात वातावरण तापले

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस धाडली आहे. नोटीसनुसार २९ डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना गेल्या महिन्यात ईडीने नोटीस बजावली. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस आली. त्यापाठोपाठ राऊत यांच्या पत्नीला नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संजय राऊत म्हणाले, मला नोटिसीसंदर्भात काहीही कल्पना नाही. माझ्यापर्यंत याबाबत काहीही माहिती आलेली नाही. घरी नोटीस आली असेल तर मी पत्रकार परिषद घेईन आणि माहिती देईन.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत. राजकीय द्वेषामुळे भीती निर्माण करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा भाजप व मोदी सरकारकडून वापर होत असल्याचे मलिक म्हणाले आहेत.

ईडी आहे की वेडी ? : ही ईडी आहे की वेडी आहे. एवढे घाणेरडे प्रकार होत असतील तर राजकारण कोणत्या थराला गेले आहे हे लक्षात येते ? वर्षा राऊत आणि पीएमसी बँकेचा काय संबंध आहे? सत्तेसाठी असे घाणेरडे प्रकार सुरु आहेत. हा प्रकार सुरु राहिल्यास ईडीसारख्या संस्थांना टाळे ठोकावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

ईडी,सीबीआय कार्यालये भाजप कार्यालयात शिफ्ट करावी : भाजपच्या अलिशान कार्यालयात ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांची कार्यालये शिफ्ट करावीत. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजप विरोधकांची जुने प्रकरणे उकरुन काढून त्रास दिला जातो आहे. जनतेला हे समजले आहे, अशी प्रदेश काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले.

विरोधकांना धमकावण्यासाठी वापर : नोटीसवर राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ईडीचा खेळ सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांना धमकावण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली जात आहे. उर्वरित. स्पाेर्ट॰स

काय आहे प्रकरण : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात प्रवीणच्या खात्यातून मोठी रक्कम आली होती. संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वर्षा यांच्या खात्यात कर्जासाठी काही रक्कम घेतल्याचे नमूद केेले आहे. हा व्यवहार ईडीला जाणून घ्यायचा आहे.

बातम्या आणखी आहेत...