आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार क्षेत्र:कराड जनता बँकेवर ईडीचा छापा; 4 कर्जांबाबत चौकशी

सांगली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड जनता बँकेच्या कराड येथील मुख्य कार्यालयात ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी छापा टाकला. हा छापा प्रामुख्याने चार मोठ्या कर्जदारांना दिलेल्या कर्जासंदर्भात होता. या चौकशीमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी अवसायनिक मनोर माळी यांच्याकडे ईडीने बँकेकडून घेतलेल्या कर्जाबाबत अहवाल मागवला होता. तत्पूर्वी ईडी कार्यालयात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सूर्यवंशी या दोघांचीही अधिकाऱ्यांनी १० तास चौकशी केली होती. कराड जनता बँकेच्या बेहिशेबी कर्जवाटपासह त्यांच्या मंजुरीसंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रश्नामुळे बँकेचे व्यवस्थापन संकटात सापडले आहे. या बँकेने दिलेल्या ५०० कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी बँकेने ही रक्कम वसूल केली नाही. या चार कर्जदारांपैकी दोघांना विनातारण कर्ज दिल्याने त्याविरोधात चौकशी केली जात आहे. त्यामुळे कर्ज मर्यादेच्या पालनाच्या नियमांना डावलनू कर्ज वाटल्याने ईडीकडे तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...