आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 हजार कोटींचा PNB घोटाळा:ED ने फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची 14 कोटी रुपयांची संपत्ती केली जप्त

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँटीगामध्ये वास्तव्यास आहे चोकसी

13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या पंजाब नॅशनल बँकेतीला घोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीवर अंमलबजावनी संचालनालया(ED)ने मोठी कारवाई केली आहे. ED ने मनी लॉन्ड्रिंग प्रिवेंशन अॅक्ट (PMLA) अंतर्गत गीतांजली ग्रुप आणि याचे प्रमोटर मेहुल चोकसीची मुंबईमधील 14 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मेहुल चोकसी तीन वर्षांपूर्वी भारतातून पळून गेला होता. ईडीने यापुर्वीही मेहूल चोकसी आणि या प्रकरणातील इतर आरोपींची संपत्ती जप्त केली आहे.

मुंबईतील ही संपत्ती जप्त केली

  • मुंबईतील गोरेगावच्या O2 टॉवरमधील एक 1,460 चौरस फुट आकाराच फ्लॅट.
  • गोल्ड आणि प्लॅटिनम ज्वेलरी.
  • हीरे, चांदी आणि मोत्यांचे नेकलेस.
  • महाग घड्याळ आणि एक मर्सिडीज बेंज कार.

अँटीगामध्ये वास्तव्यास आहे चोकसी

तपास यंत्रणांनी सांगितल्यानुसार, मेहुल चोकसी भारतातून पळून अँटीगामध्ये राहत आहे. चोकसीला जानेवारी 2018 मध्ये अँटीगा आणि बारबुडाचे नागरिकत्व मिळाले आहे. तर, मेहुल चोकसीचा भाच्चा आणि पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये आहे. तिथे त्याच्यावर भारताच्या स्वाधिन करण्याचा खटला सुरू आहे.