आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो ;प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनी ईडीला घाबरू नये- रावसाहेब दानवे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकल्या. यासोबत त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ईडीच्या या कारवाईमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर ही सुडबुद्धीची कारवाई असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. यावर भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बातचीतमध्ये रावसाहेब दानवे म्हणाले की, 'आपण स्वच्छ आल्यास ईडीला घाबरण्याचे कारण नाही. प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनीही ईडीला घाबरू नये. छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. माझ्याही घरावर छापा पडेल, पण मी स्वच्छ असेल तर घाबरणार नाही', असे मत दानवे यांनी बोलून दाखवले.

प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ही 'ऑपरेशन लोटस'चा भाग- छगन भुजबळ

'मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. निवडणुकीच्या काळात शरद पवारांना ईडीने नोटीस बजावली होती. आता आमदार प्रताप सरनाईक यांचेही तसेच झाले आहे. पण, आता जनतेलाही माहित झाले की भाजपविरोधात कुणी बोलले तर त्यांना त्रास देण्यासाठी अशा संस्थांचा वापर होत आहे. ईडीची कारवाई ही 'ऑपरेशन लोटस'चा भाग असू शकते, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

काहीही करा, पुढची 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही- संजय राऊत

'हे सरकार पुढील 4 वर्षेच नाही तर पुढची 25 वर्षे सत्तेत राहील. काहीही झाले तरी आमचे आमदार आणि नेते कुणाला शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. ईडीचा किंवा कुणाचा दबाव सरकारवर आणणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. पुढील 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही ही काळ्या दगरावरची रेष आहे,' अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser