आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Efforts To Enable Students To Take Exams From Home; Information Of Higher And Technical Education Minister Uday Samant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षांवर निर्णय:राज्यात ‘फायनल’च्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये; घरी बसूनच परीक्षा देता यावी यासाठी प्रयत्न, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातअंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरूवात
  • 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत परीक्षा आणि निकालासह संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार

विद्यापीठ आणि महाविद्यालयातील अंितम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याचा विचार करून परीक्षेसाठी घराबाहेर न जाता घरी बसूनच परीक्षा देता यावी अशा परीक्षा पद्धतीचे नियोजन करण्यात येत आहे,अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.

सोमवारी मंत्रालयात सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक झाली. या वेळी बैठकीत परीक्षा किती तारखेपर्यंत घेऊ शकतो, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, परीक्षेची तारीख किती असावी, निकालाची तारीख किती असावी, परीक्षा पद्धत कशी असेल, अशा विविध विषयांवर विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार ऑक्टोबर महिन्यात सर्व विद्यापीठे परीक्षेचे आयोजन करून निकाल जाहीर करतील. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेसंदर्भात निकालासह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी आणि ज्या विद्यापीठांना स्थानिक पातळीवरील कोविड-१९ चा प्रादुर्भाव किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांनी आपली निकालाची प्रक्रिया जास्तीत जास्त १० नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.

एटीकेटी विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय

विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधी व न्याय विभाग आणि अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. परीक्षा पद्धतीसंदर्भात गठित केलेल्या समितीची बैठक बुधवार, २ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी होईल. त्यानंत