आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा सणांवर परिणाम:बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत सर्व संबंधितांचे एकमत

सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे  आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले,त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने , जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते आज बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाईन  बैठकीत बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली. लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोगयोत्सव साजरा करण्याचा कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला. हा कोरोना व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच काम नये. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत, किंबहुना नियंत्रित प्रमाणात उघडल्या आहेत. जुलै अखेरीस कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. ऑगस्टपासून जर हा आलेख वर गेला तर नियंत्रण कठीण होईल. कारण सर्व ताण काम करणाऱ्या यंत्रणांवर आहे. मागील 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने आणि नियमांचे पालन करून साजरी करावीस” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी देखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी असे आवाहन केले आहे.