आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाथाभाऊनी बांधले घड्याळ:पण आज त्यांना कळेल की, 'टायगर अभी जिंदा है'; जयंत पाटलांची भाजपवर मिष्किल टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

यावेळी पाटील म्हणाले की, भाजपच्या कार्यकाळात एकनाथ खडसेंसारख्या सभागृहात पहिल्या रांगेत बसणाऱ्या नेत्याला कटकारस्थाने करुन मागच्या रांगेत बसवण्यात आले. एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी आम्ही वेळोवेळी सभागृहात बोललो आहोत. त्यावेळी मी 'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?' असा प्रश्न सभागृहात विचारला होता. त्यावेळेस मला याचे उत्तर मिळाले नाही, पण आज त्यांना कळेल की, 'टायगर अभी जिंदा है' , अशी मिष्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.

पाटील पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्रात आजपर्यंत कधीही सुडाचे राजकारण झाले नाही. आपल्या राज्याची तशी संस्कृती नाही. शरद पवारांकडून आम्ही महाराष्ट्राचे सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवले. पण, महाराष्ट्रात मागील 4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले', अशी टीका जयंत पाटील यांनी केली.