आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरचा आहेर:'गेल्या 10-12 वर्षात जन्माला आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवत आहेत'; खडसेंचा पक्षाला घरचा आहेर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या वेळेस पक्षाकडून डावलल्या गेल्याची भावना भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या मनातून अद्याप गेलेली नाही. आज एकनाथ खडसेंचा वाढदिवस आहे, यावेळी 'गेल्या 10-12 वर्षात जन्माला आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत' असा टोला खडसेंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना लगावला.

यावेळी खडसे म्हणाले की, 'फक्त मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, ही गोष्ट जनतेला आवडली नाही. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणले होते. त्यावेळेस आत्ताचे अनेक नेते नव्हते. परंतू, हे अलीकडे 10-12 वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत. मी गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही,' अशी प्रतिक्रीया खडसेंनी दिली.