आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आपली मुलगी शारदा खडसे-चौधरी यांच्यासोबत अखेर चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी(ED) कार्यालयात हजर झाले आहे. पुण्यातील भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी होत आहे. यापूर्वी ईडीने खडसेंना 30 डिसेंबर 2020 ला चौकशीसाठी बोलावले होते, पण कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांनी 14 दिवसांचा वेळ मागितला होता.
एकनाथ खडसेंवर हा आरोप आहे
एकनाथ खडसे यांना ज्या प्रकरणात ईडीनो चौकशीसाठी बोलावले आहे, ते भोसरी MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेवलपमेंट कॉर्पोरेशन) च्या एका जमीन व्यवहाराशी संबंधित आहे. खडसे यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी भाजप सरकारमध्ये मंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करत, भोसरीतील 3 एकर जमीन 2 लाख रुपयात खरेदी करुन नंतर 7 कोटी रुपयात विकली. यानंतर हे पैसे त्यांनी आपल्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तींच्या फर्ममध्ये ट्रांसफर केले.
2017 मध्ये दाखल झाला होता गुन्हा
एकनाथ खडसे 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री होते. कंस्ट्रक्शन क्षेत्राशी संबंधित हेमंत गवांडे नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर 2017 मध्ये अँटी करप्शन ब्यूरोने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन खडसेंविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या विरोधातही गुन्हा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.