आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत भाजपचा कोणताच आमदार जाणार नाही- रामदास आठवले

बारामतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले अतिवृष्टी ग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत दरम्यान एकनाथ खडसेंच्या राजीनामा आणि पक्षांतराविषयी प्रतिक्रिया दिली. 15-16 आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे करत असले तरी आठवले यांनी खडसेंचा हा दावा फेटाळून लावला आहे.

यावेळी आठवले म्हणाले की, 'एकनाथ खडसेंबरोबर 15-16 आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. खडसे आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील, त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही,' असे आठवले म्हणाले. तसेच, खडसेंनी रिपाइंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. पण ते राष्ट्रवादीत गेले, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही आठवले म्हणाले.

राज्याने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत बोलताना आठवले म्हणाले की, 'पूरग्रस्तानां केंद्राकडून मदत मिळणारच आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची सर्वात आधी राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्याने आधी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,' शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माहिती देणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.