आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीची नोटीस:एकनाथ खडसे आज ईडीसमोर हजर होणार नाहीत, पत्रकाद्वारे स्वतः खडसेंनी दिली माहिती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती खडसेंनी दिली

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने आज चौकशीसाठी बोलावले होते. पण, आज ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणार नाही. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत असल्याची माहिती खडसे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी खडसेंना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यानुसार, आज 30 डिसेंबरला त्यांना ईडी कार्यालयात हजर राहायचे होते. पण, मागील दोन दिवसांपासून खडसेंना ताप, सर्दी आणि खोकला जाणवत असल्याने, त्यांनी चाचणी केली असून अहवाल प्रतीक्षेत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी खडसेंना 14 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत ईडीला कळवले असून त्यांनी 14 दिवसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी दिली असल्याचे खडसेंनी सांगितले.

एकनाथ खडसेंनी पत्रकात म्हटले की, "दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथील कार्यालयात उपस्थित होण्याबाबत सक्त वसुली संचालनालय (ईडी) कडून समन्स प्राप्त झाले होते. ईडी कार्यालयाकडे खुलासा सादर करण्यासाठी दिनांक 30 डिसेंबर रोजी हजर होणार होतोच. मात्र मध्यंतरी 28 डिसेंबर रोजी ताप, सर्दी, कोरडा खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणा त जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक आहे. तसे ईडी कार्यालयास कळवले आहे. त्यांनी 14 दिवसांनंतर हजर होण्याबाबत संमती दिलेली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यावर सक्त वसुली संचालयास पूर्ण सहकार्य करणार आहे. धन्यवाद"

बातम्या आणखी आहेत...