आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Election Result : Congress' Jitesh Raosaheb Antapurkar Wins Deglur Biloli By election By 41,933 Votes, A Big Blow To BJP

देगलूर बिलोली पोटनिवडणूक:देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर 41,933 मतांनी विजयी, भाजपला मोठा धक्का

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणूकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी बाजी मारली आहे. अंतापूरकर हे सकाळीपासूनच आघाडीवर पाहायला मिळत होते.

त्यानंतर अखेर ते 41933 मतांनी विजयी झाले आहे. भाजपकडून सुभाष साबणे, तर वंचिक कडून डॉ.उत्तम रामराव इंगोले हे उमेदवार होते. आज सकाळापासून 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी सुरु होती. या पार पडलेल्या निवडणुकीत 64.95 % इतके मतदान झाले होते.

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त ठेवण्यात आली होती. त्याची पोटनिवडणूक 30 ऑक्टोंबर रोजी पार पडली होती. त्यात काँग्रेस, भाजपसह वंचित बहुजन आघाडीने देखील आपली कंबर कसली होती. निकालाच्या एकूण 30 फेऱ्या होणार होत्या त्यात 29 व्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर 41 हजार 557 मतांनी आघाडीवर होते.

दादरा-नगर हवेलीत शिवसेनेला यश

दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात शिवसेनेचे यश पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्राबाहेर महिला खासदार शिवसेनेला मिळाली आहे. दादरा-नगर हवेली या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना 50 हजारांनी अधिक मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या आहेत. आज निवडणुकीत सुमारे 75.91 टक्के मतदान पार पडले होते.

शिवसेनेने स्व. खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून महेश गावित आणि काँग्रेसकडून महेश धोदी यांनां उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत कलाबेन यांचा विजय झाला असून, त्यांना 1 लाख 16 हजार 834 मते मिळाली आहे. तर भाजपला 66 हजार 157 मतांवर तर काँग्रेसला 50 हजार 677 मतांवर समाधान मानावे लागले.

भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे दादरा-नगर हवेली येथे पोटनिवडणुक पार पडली होती. यामध्ये भाजप आणि शिवसेनेने चांगली कंबर कसली होती. शिवसेनेने आपला उमेदवार म्हणून स्व. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना घोषित केले होते. तर भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...