आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Elections For 5 Seats Of Legislative Council Graduate And Teacher Constituency Announced, Polling Will Be Held On 1st December

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक जाहीर:विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, 1 डिसेंबरला होणार मतदान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर झाली आहे. या 5 जागांसाठी येत्या 1 डिसेंबरला मतदान होणार होईल. या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढत पाहायला मिळेल.

1 डिसेंबरला होणारी निवडणूक औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघासाठी होईल. यापूर्वी भाजप-शिवसेना सोबत होते. पण, यंदा भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे तीन पक्ष पाहायला मिळतील. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली आहेत, परंतु ती गुपित आहेत. ही नावे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.