आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना झटका!:जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजेचा शॉक, इतरांनाही केलं सावध

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान विजेचा शॉक बसल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. भर पावसात सुरू असणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेत राणे कणकवलीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी केलेल्या रोषणाईचा शॉक राणेंना शुक्रवारी बसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नारायण राणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी स्टेजवर चढताना हा शॉक लागण्याचा प्रसंग घडला.

नारायण राणे हे भर पावसात कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सभोवताली फुलांच्या हाराची तसेच इलेक्ट्रिक रोषणाई करण्यात आली होती. महाराज्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर राणे तिथून निघाले. त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राणेंनी चालताना रेलिंगचा आधार घेतला. त्यावेळी एक ठिकाणी राणेंना जोरदार शॉक लागला. तेव्हा राणेंना आपला हात जोरात झटकला आणि बाजूला झाले. राणेंनी सोबत असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरांनाही त्या ठिकाणी शॉक लागत असल्याचं सांगत सावध केलं.

बातम्या आणखी आहेत...