आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीज बिलात सवलत:राज्य सरकारचा नागरिकांना दिलासा, एप्रिल ते जूनच्या वीज बिलात मिळणार सूट

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊन काळात सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना वीजबिलाचा शॉक बसला. वाढलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर आता राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे.

या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच वीज ग्राहकांना 2019 मध्ये जेवढ्या विजेचा वापर केला असेल तेवढेच वीज बिल या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात ग्राहकांना भरायला लागणार आहे. त्यावरील वीज वापराचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. राज्य सरकार 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत पूर्णपणे भरणार आहे.

याच पद्धतीने जर विजेचा वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराच्या 50 टक्के भार हा राज्य सरकार उचलणार आहे. त्याशिवाय जर वीज वापर हा 301 ते 500 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 25 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. ज्यांनी वीज बिल भरलेले आहे अशा ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू नसेल.