आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातल्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. वीज वितरण कंपन्यांनी वीज दरवाढीचा निर्णय आजपासून लागू केला असून, त्यामुळे घरगुती दरात 6 टक्क्यांची वाढ केली आहे. आधीच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्यांना हा मोठा झटका आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरने ही दरवाढ केली आहे. त्यासाठी आर्थिक तोट्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
अशी आहे दरवाढ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के, तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के, तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ असेल. बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के झाली आहे. 2024-25 साठी 6.35 टक्क्यांची दरवाढ असेल.
अदानींचाही दणका...
अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के दरवाढ झाली आहे. त्यात 2023-24 साठी 2.1 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाल्याचे समजते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.
महावितरण म्हणते की...
महावितरण अर्थातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महावितरण मुंबईतील काही क्षेत्रांसह, महाराष्ट्रात विजेचे वितरण करणारी एक परवानाधारक आहे. महावितरणची आर्थिक वर्ष २०१९-२०२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ करिता अचूक समायोजन (true-up ) २०२२-२३ करिता तात्पुरते अचूक समायोजन (provisional truing-up) तसेच २०२३-२४ आणि २०२४-२५ या नियंत्रण कालावधीकरिता अंदाजित एकूण महसुली गरज ( ARR ) आणि वीज दरास मंजुरीसाठीची वीज दर याचिका २४ जानेवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दाखल करून घेतली.
आजपासून दर लागू
महावितरण पुढे म्हणते की, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या आणि २१ फेब्रुवारी, २०२३ ते ०३ मार्च, २०२३ दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक जाहीर सुनावण्या घेतल्या. जनतेशी सल्लामसलतीच्या या प्रक्रियेनंतर आयोगाने ३१ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष २०२३ - २४ आणि २०२४-२५ साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अंमलात येतील.
वीज गळती वाढली
राज्यात वीज गळती व वीज चोरीवर नियंत्रण नाही. मराठवाड्यातील काही फिडरवर 80 ते 99 टक्क्यांपुढे वीज गळती होत आहे. यामुळे वीज हानी वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी या नुकसानभरपाईसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करून ग्राहकांकडून तो वसूल केला जात आहे, असा आरोप वीज क्षेत्रातील अभ्यासक अजित देशपांडे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात महागडी वीज
आंध्र प्रदेशमध्ये आधिभारासह कमीत कमी 1.9 आणि जास्तीत जास्त 9.75 रुपये, गुजरात 3.5 ते 5.2, दिल्ली 3 ते 8 रुपये, गोवा 1.6 ते 4.5 रुपये वीज दर आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात 5.36 ते 15.56 रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळते. म्हणजेच इतर राज्यांच्या तुलनेत तीन पटीपर्यंत वीज बिल जास्त आहे. तरीही नव्याने वीज दरवाढ केली आहे. त्यामुळे राज्यभरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.