आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड-महाराष्ट्र बॉर्डरवर चकमक:पोलिसांच्या टीमने नक्षलवाद्यांना गोळ्या झाडून दिले उत्तर, दोन जणांना कंठस्नान; त्यांचे मृतदेह जंगलात सोडून पळाले साथीदार

रायपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 नक्षलवाद्यांचा गट जंगलात जमला असल्याची माहिती पोलिसांच्या टीमला मिळाली होती.

छत्तीसगडमधील राजनांदगावजवळील गडचिरोली येथे गुरुवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार कोहकाच्या कामखेडा जंगलात झाला. पहाटे साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान गोळ्यांचा आवाज ऐकू आला. गडचिरोली पोलिसांचे विशेष लढाऊ युनिट सी -60 कमांडोर आणि इतर सुरक्षा कर्मचारी यांचे पथक या भागात गस्त घालत होते तेव्हाच त्यांचा नक्षल्यांसोबत आमना-सामना झाला.

या गुप्त माहितीच्या आधारावर गेले होते पथक
गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी माध्यमांना सांगितले की, 25 नक्षलवाद्यांचा गट जंगलात जमला असल्याची माहिती पोलिसांच्या टीमला मिळाली होती. ते म्हणाले की पोलिसांची टीम पाहिल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनीही प्रत्युत्तर दिले.

ही चकमक सुमारे दीड ते दोन तास चालली. पोलिसांच्या जोरदार गोळीबारानंतर घाबरून नक्षलवादी पळून गेले. त्यानंतर, त्या भागाच्या झडती दरम्यान पोलिसांना एका महिलेसह दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. तेथे नक्षलशी संबंधित इतर साहित्य सापडले आहे. पोलिस पथक बेस कँपकडे परत येत आहे, त्यानंतर चकमकीबद्दल आणखी काही माहितीही समोर येऊ शकते.

2 आठवड्यात दुसरी चकमक
यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी गडचिरोली नक्षलवाद्यांच्या चकमकीची बातमीही मिळाली होती. सोमवारी परमिली परिसरात नक्षलवाद्यांनी अचानक चार ट्रॅक्टर व दोन टँकर पेटवून दिले, यामुळे लोकांचे लाखोंचे नुकसान झाले. मात्र, नक्षलवादी हल्ल्यात कोणीही ठार झाल्याचे वृत्त मिळाले नाही. गडचिरोलीतच नक्षलवाद्यांनी पोलिस स्टेशनवर ग्रेनेडने हल्ला केला होता. ग्रेनेडचा स्फोट झाला नाही, त्यामुळे मोठा अपघात टळला.

बातम्या आणखी आहेत...