आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात वीजबिलामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. 'कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने कार्यक्षमता न दाखविल्याने व वीजबिलांची वसुली न केल्याने बसला आहे', असा आरोप राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता. यानंतर आता भाजप नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे. 'उर्जामंत्री एकतर अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जाते. आता तोंड लपवायची वेळ आल्याने ते चुकीची आकडेवारी सांगत आहेत', असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदेतून केला.
'हिम्मत असेल तर वीज बिल माफ करा'
यावेळ फडणवीस म्हणाले की, 'आमच्या काळात स्टेट युटिलिटी मजबूत झाली. त्याच्या आधी परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात त्याची परिस्थिती काय होती, याची आकडेवारी बावनकुळेंनी प्रसिद्ध केलेली होती. आपले अपयश झाकण्यासाठी कधी केंद्राकडे बोट दाखवायचे, तर कधी मागच्या सरकारकडे बोट दाखवायचे. तुमच्यात ताकद आणि शक्ती असेल तर वीज बिल माफीची घोषणा करा, नाहीतर घोषणा करू नका', अशी रोखठोक भूमिका फडणवीसांना मांडली.
कालच ऊर्जामंत्र्यांनी सर्वसामान्यांना वीजबिल माफी मिळणार नसल्याचे सांगितले होते. 'लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही', असे नितीन राऊत म्हणाले होते.
'जम्मू-काश्मीरात 370 कलम कधीच लागू होणार नाही'
'जम्मू-काश्मीमध्ये भारतविरोधी शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करुन तिथे पुन्हा एकदा कलम 370 लागू झाला पाहिजे, अशाप्रकारचा प्रयत्न करत आहेत. तिथे पुन्हा कलम 370 लागू व्हावी, यासाठी तेथील अनेक पक्ष एकत्र आले आहे. या गुपकर आघाडीत काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे. काँग्रेसला मला एक प्रश्न विचारायचा आहे, देश तोडण्याची भाषा करणाऱ्या गुपकर अलायन्सचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?' असा घणाघात फडणवीसांनी काँग्रेसवर केला. तसेच, 'काश्मीरमध्ये 370 कलम लागू होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.