आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:'सत्ताधाऱ्यांनी संभ्रम निर्माण करू नये, माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मी टीकेचा धनी'- देवेंद्र फडणवीस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही'

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाला स्थगितीच्या निर्णयावर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान फडणवीस म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटलेला नाही. काही लोकं राजकीय फायद्यासाठी केंद्रावर खापर फोडत आहेत. राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही', असे फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, 'आरक्षणाबद्दल मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी समाजाच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. काही लोकं फक्त राजकीय स्वार्थासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खापर केंद्रावर फोडत आहेत. राज्याचा कायदा असल्याने केंद्राचा संबंध नाही, असे फडणवीस म्हणाले. याशिवाय फडणवीसांनी त्यांच्यावर होत असलेल्या वयक्तित टीकेवर बोलताना म्हणाले की, 'माझी जात ब्राह्मण असल्यामुळे मला टीकेचा धनी केले जात आहे. पण, मराठा समाजाला माहित आहे की, त्यांच्यासाठी मी कीती केले आहे.'

छत्रपती घराण्यात वाद निर्माण करू नये

न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्यावरुन दोन गट पडले आहेत. कुणी म्हणतं की, उदनयराजे यांनी नेतृत्व करावे तर, कुणी म्हणतं, संभाजीराजे यांनी करावे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'दोन्ही छत्रपती आमच्यासाठी आदरणीय आहेत. छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडू नये. नेतृत्व दोघांनीही करावे. दोघांमध्ये नेतृत्वासाठी वाद नाही. त्यामुळं कुणी तसा वाद लावू नये', असे फडणवीस म्हणाले.

सध्या भरती करणे योग्य नाही

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भरतीसंदर्भातील केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभुमीवर फडणवीस म्हणाले की, 'अशा परिस्थितीत सरकारने भरतीचा निर्णय घेऊ नये. अशा प्रकारचा निर्णय घेताना सर्व घटकांशी चर्चा करावी. राज्याची स्थिती गंभीर असताना असे निर्णय घेताना विचार करावा. एक महिना उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. याबाबत चर्चा तरी करावी. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आता भरतीचा निर्णय योग्य नाही.'