आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नेत्यांना कोरोना:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण

लातूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील काहि दिवसांपासून लक्षणे जाणवत असल्यामुळे 91 वर्षीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची तपासणी केली असता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सध्या त्यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

माजी मंत्री व त्यांचे नातू आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 'आ. दादासाहेब म्हणजे माझे आजोबा, माजी मुख्यमंत्री श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना वयाच्या 91व्या वर्षी कोरोना संसर्ग झाला असला तरीही तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती स्थिर आहे,' असे ते म्हणाले.

राज्यात आतापर्यंत अनेक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्र्याना कोरोनाची लागण झाली. सर्वात आधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नंतर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.