आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Examinations Of All Universities Will Be Online, Announcement Of Higher And Technical Education Minister Uday Samant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी बातमी:सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत

राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सर्व विद्यापीठांच्या पदवीच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यात कठोर निर्बंध लावण्या आले आहेत. अशात ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. पत्रकार परीषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या, आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळे निकाल लवकर लागेल. यासह राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत
या संकट काळात सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांनी पुढे येऊन प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या दिशेने NSS आणि NCC ची मुले कोरोना संकटात सामाजिक कामात सहभागी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...