आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sanjay Rathore's Explanation On The Allegations Of Demanding Bodily Pleasures, Alleging That My Political Journey Is Being Ruined

संजय राठोडांनी आरोप फेटाळले:शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपांवर संजय राठोडांचे स्पष्टीकरण, माझा राजकीय प्रवास उद्ध्वस्त करत असल्याचा केला आरोप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोड यांनी माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने शरीरसुखाची मागणी केल्याचे आरोप केले आहेत. याबाबत संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार यवतमाळ पोलिसांकडे करण्यात आली होती. ही तक्रार पोस्टाने पाठवण्यात आली असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितलं होतं. संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैगिंक छळ करतो, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. त्यावर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे - राठोड

माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मला अन्नोन नंबर वरून मेसेज येत आहेत. तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू, मुंबईत तुमच्या विरोधात ही तक्रार दाखल करू, ती तक्रार दाखल करू असं सांगितलं जात आहे. मात्र मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. समाजाच्या प्रगतीसाठी जे करता येईल ते मी करतच राहणार असं म्हणत संजय राठोड यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत.

'राजकारणातून मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न'
माझ्या शाळेतील कर्मचारी संजय जैस्वाल यांनीही तक्रार केली आहे. पोलिसांनाही त्याची माहिती आहे. जे काही आहे ते तपासातून पुढे येणारच आहे. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणात माझी ही बाजू यावी म्हणून मी समोर आलोय, असं सांगतानाच एखाद्या प्रकरणात टार्गेट करून मागे लागण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. मी 30 वर्षापासून राजकारणात आहे. पण असे आरोप करून राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला.

बातम्या आणखी आहेत...