आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Explosion At Illegal Cracker Factory In Hapood, 12 Killed; The License Was For The Manufacture Of Electrical Goods

दुर्दैवी घटना:हापूडमधील फटाक्याच्या अवैध कारखान्यात स्फोट, 12 मृत्युमुखी; विद्युत वस्तू निर्मितीचा होता परवाना

धौलाना, हापूडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी स्फोट झाला. यात १२ मजुरांचा मृत्यू झाला तर २० जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दिललीच्या सफदरजंग आणि मेरठला पाठवण्यात आले आहे.

दारुगोळ्यामुळे हा स्फोट झाला असून घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन केले. ही घटना धौलाना विभागातील हापूड येथे घडली. कारखान्यात विजेच्या वस्तू बनवण्याच्या नावाखाली परवाना घेण्यात आला होता.

विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, ‘इंडस्ट्रियल युनिटमध्ये हा स्फोट झाला. कारखाना मालकाने इलेक्ट्रिक उपकरण निर्मितीचा परवाना घेतला होता. मात्र तेथे फटाके बनवले जात होते.

शेजारील कारखान्यांचे छत उडाले
घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, कारखान्यात प्लास्टिक बंदूक व त्यात वापरला जाणाऱ्या दारुगोळ्याची निर्मिती केली जात होती. दारुगोळ्याचा स्फोट झाल्याने कामगार होरपळले. स्फोट इतका तीव्र होता की शेजारच्या कारखान्यांवरील छत उडाले.

बातम्या आणखी आहेत...