आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान किसान सन्मान निधी:पैसे परत करण्यास कमालीची उदासीनता, शेतकऱ्यांकडून 222 कोटींपैकी 70 कोटीच परत

अतुल पेठकर | नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयकर भरणारे तसेच लठ्ठ पगाराच्या शेतकरी व्यक्तींनाही या योजनेत लाभ मिळाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र नसतानाही बँक खात्यात थेट रक्कम जमा झालेले शेतकरी ही रक्कम परत करण्याबाबत कमालीचे उदासीन असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील अपात्र शेतकऱ्यांकडून २२२ कोटी १८ लाख ३८ हजार इतकी रक्कम येणे बाकी आहे. वारंवार स्मरण पत्रे दिल्यानंतर त्यापैकी ७० कोटी ५३ लाख ६० हजार रुपये भरले गेल्याची माहिती मुख्य सांख्यिकी अधिकारी जयंत टेकाळे यांनी दिली.

आयकर भरणारे तसेच लठ्ठ पगाराच्या शेतकरी व्यक्तींनाही या योजनेत लाभ मिळाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर अशा अपात्र शेतकरी वा व्यक्तींना स्मरणपत्र देऊन बँक खात्यात जमा झालेली रक्कम परत करण्यास सांगण्यात येते. मात्र, रक्कम परत करण्यास शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात अपात्र शेतकऱ्यांसह आयकर भरणारे एकूण २ लाख ६२ हजार ९१३ शेतकरी आहेत. यापैकी सुमारे २ लाख ५० हजार ८८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कमीत कमी एक हप्ता जमा झाला आहे. राज्यात अपात्रसह सर्वाधिक शेतकरी जळगाव १६,०४६, कोल्हापूर १६,२६२, सोलापूर १६,१०१, नाशिक १३,३९७, सांगली १५,९५०, सातारा २२,०५९, पुणे २१,१४१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १,८१९ शेतकरी आहेत. त्यांनी ७ लाख ४४ हजार रुपये परत केले अाहेत. या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांनी ३८ लाख ९० हजार, गडचिरोली ४३ लाख ७६ हजार, हिंगोली ४३ लाख ८० हजार रुपये परत केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...