आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 'Fabiflu' Pill To Be Used In Private Hospitals , Doctor Will Prescribe; Food And Supplies Minister Dr. Rajendra Shingane Said

कोरोना औषध:'फेबीफ्लू' गोळीचा होणार कोरोना साठी खासगीत उपयोग, डॉक्टरच लिहून देतील प्रिस्क्रिप्शन; अन्न व पुरवठा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनावर औषध नाही पण खासगी सेवेतील डॉक्टर लक्षणे आढळल्यास 'फेबीफ्लू' या गोळ्या देऊ शकणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध पुरवठा मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिव्य मराठीशी झालेल्या बातचीतमध्ये सांगितले.

यावेळी शिंगणे म्हणाले की, हात धुवा, सॅनिटायझर वापरा, फिजिकल डिस्टन्स ठेवा अशा विविध सूचना व आवाहन करण्यात आले आहे. आता कोरोनाचे संक्रमण तोडण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, त्यांनी ती पाळावी. कोरोना संदर्भात बरेच आवाहन झाली आहेत तर प्रशासन सुद्धा काम करत आहे. बुलडाणा येथे 100 बेडचे आय सी यु कोव्हिड हॉस्पिटलचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...