आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारचा निर्णय:फडणवीस सरकारच्य काळात आलेली 'बळीराजा चेतना योजना' ठाकरे सरकारकडून बंद

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेतलेला आणखी एक निर्णय रद्द केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी फडणवीस सरकारने आणलेली 'बळीराजा चेतना योजना' ठाकरे सरकारकडून बंद करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. 'मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात बळीराजा चेतना योजनेला अपयशी ठरली आहे. त्यामुळे 24 जुलै 2015 रोजी जाहीर करण्यात आलेली ही योजना तातडीने बंद करण्यात येत आहे', असे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने बुधवारी जारी केले.

एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारने योजनेचा आढावा घेतला, तेव्हा उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात कोणतीही घट झाली नसल्याचे स्पष्ट झाले. एका संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2001 ते 2019 या काळात महाराष्ट्रात 32 हजार 605 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. फडणवीस यांच्या काळात, म्हणजेच 2015 ते 2018 दरम्यान 14 हजार 989 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

काय होती बळीराजा चेतना योजना?

2016 मध्ये आलेल्या बळीराजा चेतना योजनेत व्यथित शेतकर्‍यांना शोधणे, शेतकर्‍यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणे, त्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवणे आणि कर्जाचे पुनर्गठन या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणे, इत्यादी कामे होती. तसेच, अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, महसूल, वित्त, जलसंपदा आणि महिला व बालकल्याण विभागांच्या योजनांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही फडणवीस सरकारने मांडला होता.

बातम्या आणखी आहेत...