आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांवर कारवाई ?:फडणवीसांनी सरकारी कामात हस्तक्षेप करत पोलिसांवर दबाव टाकला- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंजेक्शनचा साठा कुणाकडे जाणार, याची चौकशी होईल

शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन मोठा राजकीय गोंधळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावरुन आता फडणवीसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला आहे. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आज ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे ते म्हणाले.

वळसे पाटील पुढे म्हणाले की, राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्रं असल्याची माहीती पोलिसांना नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. पण, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप यापूढे सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.

इंजेक्शनचा साठा कुणाला देणार होते याची चौकशी करणार

यावेळी वळसे पाटलांनी म्हटले की, हा साठा सरकारला देण्यात येणार नव्हता. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल. हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठ कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...