आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विद्यार्थ्यांना संधी:अनुतीर्ण विद्यार्थ्यांना दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • नववी आणि अकरावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाण्याची संधी

नववी आणि अकरावीला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेशित होण्याची संधी मिळणार आहे.  विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा न घेता त्यांची तोंडी परीक्षा घेत उत्तीर्ण झालेल्यांना दहावी, बारावी वर्गात प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. 'जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांना तोंडी परीक्षेची संधी देण्यात येईल. ही तोंडी परीक्षा व्हिडीओ कॉल किंवा वर्गात थेट उपस्थितीत पार पडेल', अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. 

दहावी, बारावीचा आपल्या शाळा, कॉलेजचा निकाल शंभर टक्के असावा यासाठी अनेक शाळा, कॉलेज एखादा विद्यार्थी अप्रगत राहिला असेल तर त्याला नववी, अकरावीला नापास करत असल्याचे प्रकार समोर येत होते. त्यासह या दोन वर्षातील गळतीचे प्रमाणही २२ ते २४ टक्क्यांच्या आसपास असल्याचे आकडेवारीतून समोर आले होते.  अनुत्तीर्ण किंव इतर शाळेत प्रवेशित होण्याबाबत शाळा, कॉलेजांचा आग्रह लक्षात घेत राज्यसरकारने नववी, अकरावी वर्षात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा घेत संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर शिक्षण विभागाच्या स्तरावरून या परीक्षांचे नियंत्रण ठेवल्या जाते. यंदा करोनामुळे परीक्षाच होणे शक्य नसल्याची स्थिती आहे. त्यात नववी, अकरावी फेर परीक्षा रद्द करण्यात आल्या परंतु या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याबाबत अद्याप शासनाने निर्णय न घेतल्याने संभ्रम निर्माण झाला होता. परंतु राज्यसरकारने या फेरपरीक्षा लेखी स्वरुपात न घेता तोंडी परीक्षा घेत या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्याची संधी देण्याबाबत स्पष्ट केले.