आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव:कृषी विभागाच्या सतर्कतेने बोगस बियाणे जप्त, मोठी टोळी असण्याची शक्यता

खामगाव2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौफेर लॉकडावून असतांना सुद्धा जगाच्या पोशिंद्याला गंडविणे सुरू असल्याची धक्कादायक घटना आज (दि.2) जून रोजी बोरजवळा शिवारात घडली.या वरून कृषी विभागाच्या सतर्कतेने आज उमरा शिवारात धाड टाकून कपाशीचे बोगस बियाण्यांच्या ३६ बॅग तर सोयाबीनच्या ६ बॅग व चवळी १ बॅग तसेच पावती पुस्तके, स्टॅम्प पॅड व विविध कंपनीचे शिक्के कृषी विभागाने व पोलिसांनी जप्त केले.

कृषी विभागाने व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी (एम एच ४६ बिक्यू २२८७) या मालवाहू गाडीत बोरजवळा शिवारात आरोपी जगन्नाथ गणपत बगाडे (वय ५२ रा दरेगाव ता सिंदखेडराजा) व रवींद्र रुपराव लोढे (वय ३० वर्ष रा मोहदरी ता मेहकर) हे दोघे आपल्या वाहनात बोगस कपाशी बियाणे व इतर बियाणे विक्री करीत असल्याची गुप्त माहिती खामगाव चे तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी व नांदुरा येथील तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम अंगाईत यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या कृषी विभागाच्या टीम समवेत सापळा रचून दोघांना रंगेहात बोगस बियाणे विक्री करतांना पकडले.त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकची चौकशी केली असता त्या दोघांकडे बोगस बियाणे असल्याचे आढळून आले.या दोघांनी शेतकऱ्यांना विविध अमिश देत भासवून हे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रयत्न चालविले,परंतु कृषी विभागाच्या सतर्कतेने आज हे दोघे रंगेहात पकडल्या गेले.सदर बियाणे पाकीट वर निर्मिती कंपनी चे नाव,वैध दिनांक तसेच अधिकृत विक्री परवाना नसल्याचे चौकशी त दिसून आले.तसेच या बोगस बियाण्यांची जादा दराने विक्री करतांना आढळून आले.तसेच वाहन व बियाणे किंमत एकूण २ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी गणेश गिरी यांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत.या घटनेमुळे कोण्या इतर शेतकऱ्यांनी जर असले बियाणे खरेदी केले असतील त्यांनी पोलिस स्टेशन ला फिर्याद दाखल करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ विजय पढार करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...