आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Farmer's Son Committed Suicide While Agriculture Minister Was In Melghat, Sattar Met And Consoled The Family Members Of The Suicide Victims.

शाेकांतिका:कृषिमंत्री मेळघाटात असताना शेतकऱ्याच्या पुत्राची आत्महत्या, सत्तार यांनी कुटुंबीयांचे केले सांत्वन

धारणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे ‘एक दिवस बळीराजासोबत’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट दौऱ्यावर होते. दुसरीकडे याच दिवशी ते मुक्कामाला असलेल्या ठिकाणापासून पाच किमीवरील लाकटू गावात एका शेतकरीपुत्राने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. अनिल सूरजलाल ठाकरे (२६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरीपुत्राचे नाव आहे. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी लाकटूत मृताच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करून अनिलच्या मृत्यूची तातडीने चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

अतिवृष्टीमुळे शेतजमीन संकटात येऊन पिके नष्ट झाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या या तरुणाने असे टोकाचे पाऊल उचलले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनिल याने बुधवारी नापिकी व अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून बुधवारी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्याच्यावर धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

मुक्काम स्थळाच्या ५ किमीवर आत्महत्या माझा एक दिवस बळीराजासाठी या कृषी विभागाच्या राज्यस्तरीय उपक्रमाला मेळघाटमधून सुरुवात झाली. धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषिमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी रात्रीच दाखल झाले होते. तेथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरूच आहेत. नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने ठाकरे कुटुंबीय चिंतेत होते.

बातम्या आणखी आहेत...