आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:पेन्शनचे दोन लाख मागितल्याने बापाने केला पोटच्या मुलाचा खून

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी बापासह दोघांना अटक

सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाखांची मागणी करणाऱ्या मुलास जन्मदात्या बापाने डोक्यात लोखंडी पाइपचा घाव घालून ठार केले. ही घटना रविवारी (दि. १६) सायंकाळी सटाणा रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. हितेश कृष्णा बाविस्कर (३४) असे मृताचे नाव असून छावणी पोलिसांनी बापासह इतर दोघांना अटक केली आहे.

संशयित पिता कृष्णा पौलद बाविस्कर हा एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. सेवानिवृत्त झाल्याने त्याला मोठी रक्कम मिळाली होती. पत्नीच्या मृत्यूनंतर कृष्णा हा सुलोचनाबाई दिलीप आहिरे व तिचा मुलगा अजय यांच्यासह विभक्त राहत होता. कृष्णाचा मुलगा हितेश हा पत्नी व दोन मुलींसह तिरुपती कॉलनीत वास्तव्यास होता. सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाख रुपये हितेशच्या दोन्ही मुलींच्या नावावर करण्याचे कृष्णाने कबूल केले होते. ही रक्कम घेण्यासाठी हितेश रविवारी पिता कृष्णा यांच्याकडे गेला होता. यादरम्यान त्यांच्यात वाद झाल्याने कृष्णाने सुलोचनाबाई व अजय यांच्या मदतीने हितेशच्या डोक्यात लोखंडी पाइप व तीक्ष्ण हत्याराने मारल्याने हितेश जागीच ठार झाला.

बातम्या आणखी आहेत...