आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:भांडखोरांना अडकवण्यासाठी तीन वर्षांच्या मुलीचा पित्याकडून खून, मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील खळबळजनक घटना

मंठा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसरीही मुलगी झाल्याचा राग

भांडखोरांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलीला चादरीत गुंडाळून जमिनीवर आपटत खून केल्याची घटना मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथे घडली. स्नेहा अविनाश चव्हाण (३) असे मृत मुलीचे नाव आहे. तर अविनाश लिंबा चव्हाण (३०) असे आरोपीचे नाव आहे.

अविनाशच्या घरासमोर गुरुवारी रात्री दोन महिलांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी अविनाशने जाब विचारण्यासाठी आलेल्या दोन महिलांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या तीन महिन्यांच्या मुलीला निर्दयीपणे जमिनीवर आपटले. गावातील नागरिकांनी तातडीने स्नेहाला मंठा ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

दुसरीही मुलगी झाल्याचा राग
आरोपीला दोन मुली आहेत. दुसरीही मुलगीच झाल्याने याचा राग त्याच्या मनात हाेता. शिवाय भांडणात दुसऱ्याला अडवण्यासाठी त्याने मुलीचा खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. साक्षीदारांकडूनही काही पुरावे मिळवले आहेत. आरोपीला शनिवारी कोर्टात हजर केले जाईल, असे मंठा येथील पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...