आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलगिरी:अखेर एकनाथ खडसे यांनी 'त्या' वक्तव्यामुळे मागितली ब्राह्मण समाजाची माफी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे ब्राह्मण समाजावर केलेल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'मी मुख्यमंत्रीपद एका ब्राह्मणाला दान दिले', असे वक्तव्य खडसेंनी केले होते. या वक्तव्यामुळे खडसेंवर ब्राह्मण महासंघाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच, ब्राह्मण समाजातून संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर आता खडसे यांनी माफी मागितली आहे.

याबाबत खडसे म्हणाले की, ' 6 नोव्हेंबरला झालेल्या सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.'