आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉलेज परीक्षांवर मोठा निर्णय:'आधी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारा आणि त्यानंतर टीका करा'- उदय सामंत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागणार- सुप्रीम कोर्ट

कोरोना काळात महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेविरोधात दाखल झालेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. कोर्टाने युजीसीला मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्यास नकार दर्शवत म्हटले की परीक्षा रद्द करण्याचा राज्याचा अधिकार आहे, परंतू परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थी पास होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'आधी 100 विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारा आणि त्यानंतर टीका करा, अशी प्रतिक्रीया उदय सामंत यांनी दिली.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिज्ञापत्रात आम्ही या परिस्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही असे कळवले होते. मात्र तसे करता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परीक्षा न घेण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालक यांचा विचार करुन घेतला होता. याबाबत आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करुन यातून मार्ग काढावा लागेल, असे उदय सामंत म्हणाले.

सामंत पुढे म्हणाले की, साडे आठ लाख विद्यार्थ्यांच्या भावितव्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि जीवनाचा प्रश्न महत्वाचा आहे. परीक्षा न घेण्याबाबत मत असलेल्या इतर राज्यांशी चर्चा करण्याआधी राज्याचे महाधिवक्ता आणि न्याय व विधी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करू. तसेच, राज्यातील प्रत्येक विद्यापीठात जाऊन मी स्वतः कुलगुरुंशी चर्चा करणार आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले.