आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुर्मिळ घटना:देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील पालघरमध्ये सापडला दोन तोंडाचा शार्क मासा, फोटोज इंटरनेटवर व्हायरल

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही वर्षांपूर्वी मॅक्सिकोच्या संशोधकांनी दोन तोंडाच्या शार्कचा शोध लावला होता

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सतपती गावात मासेमारी करणाऱ्यांना दोन तोंडाचा शार्क मासा सापडला आहे. या माशांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मस्त्य विभागाने या माशाला पकडणाऱ्या मच्छीमारासी संपर्क केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सतपती गावात राहणाऱ्या नितिन पाटिल यांनी या दोन तोंडाच्या शार्क माशाला पकडले. मागच्या गुरुवारी ते रोजप्रमाणे समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांच्या जाळ्यात दोन तोंडाची बेबी शार्क अडकली. या शार्कची लांबी 6 इंच होती.

देशात पहिल्यांदाच सापडला दोन तोंडाचा मासा

नितिन यांनी सांगितले की, मासा पकडल्यानंतर समजले की, हा दुर्मिळ मासा आहे. त्यामुळे आम्ही त्याला परत समुद्रात सोडले. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी सांगितले की, दोन तोंडाची शार्क मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी अशाप्रकारची शार्क कधीच सापडली नाही. काही वर्षांपूर्वी मॅक्सिकोच्या संशोधकांनी दोन तोंडाच्या शार्कचा शोध लावला होता.